Sahitya Sammelan | संमेलनाध्यक्ष सासणेंनी घेतला चिमुकल्यांच्या चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद | Sakal |
उदगीरमध्ये होत असलेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाळकरी मुलांनी महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा देखावा सादर केला. यात चिमुकले वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. जात्यावर दळलं जाणार दळण ते चुलीवरच्या भाकरी असा तो देखवा होतं. त्यात विस्मरणात चाललेलं ग्रामीण खेळ, भाजी भाकरी हे ग्रामीण भागातलं अस्सल जेवण, आणि बैलगाडीवर गंजी रचून केला जाणारा प्रवास असं सारं काही शालेय विद्यार्थ्यांनी उभं केलं. एक छोटंसं गाव पाहायला गर्दीही भरपूर होती.
एवढंच नाही तर आखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी देखील अस्सल ग्रामीण शैलीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
#Sakal #SahityaSammelan #BharatSasne #students #Maharashtra #Marathinews #Maharashtranews